भाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र
Unit for Sodium Hypochlorite SolutionInnovation
समस्या: कोरोनाच्या काळात बाजारातून आणलेला भाजीपाला, फळे यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक होते.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा-पर्यावरण या विभागामध्ये एक काचेचे भांडे तयार करून त्यात ६ कार्बन चे रॉड बसवून अडॅप्टर च्या आउटपुटला कनेक्ट करून हे उपकरण तयार केले. यात १५ ली. पाणी आणि ३०० ग्रॅ. मीठ यांचे द्रावण टाकून दोन तासांसाठी विद्युत प्रवाह चालू केला असता हिरवट-पिवळसर सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार होते. याचा वापर भाजीपाला निर्जंतुकीकरणासाठी करतात. हे द्रावण जीवाणू, विषाणू, बुरशी यांच्या संपर्कात येऊन सुक्ष्मजंतूंच्या पेशींमधील रेणूंचे ऑक्सिडेशन करून त्यांना मारण्याचे काम करते. गुरुकुलम मधील रोज १५ कि.ग्रॅ भाजीपाला या मशिन ने तयार केलेल्या द्रावणाने निर्जंतुक केला जात आहे.
एकूण खर्च: २४०० रुपये (१५ ली. क्षमतेच्या द्रावणासाठी)
Other Projects
सौर एक्झॉस्ट फॅन व लाईट
Solar Exhaust Fan and Light
शेणाच्या गोवऱ्या तयार करण्याचे यंत्र
Cow Dung Pat Maker Machine
कडधान्यांना लवकर मोड आणण्याचे यंत्र
Affordable Technologyसमस्या: गुरुकुलम आश्रम शाळेमध्ये ३५० निवासी विद्यार्थी आहेत. त्यांना नाष्ट्यासाठी हरभरा,...
Very Nice Project for cleaning vegetables from bacteria and viruses. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.