पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती मार्फत ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’
चिंचवड हे ९ जुन २००६ पासुन भटक्या विमुक्त समाजाचा मुलांच्या शिक्षणासाठी काम करते त्यासाठी पारधी, भिल्ल, वडार, कैकाडी, कोल्हाटी, डोंबारी, लमान, घिसाडी, अशा वंचित घटकातील मुलांसाठी निवासी गुरुकुल चालविले जाते. पहिली ते बारावी पर्यंतच्या नेहमीच्या अशा शिक्षणाबरोबरच पारंपारिक कला कौशल्यावर ( skill based ) आधारित आधुनिक बारावी पर्यंतच्या शिक्षणाचा मेळ यात घातला आहे. पहिली पासूनच अभियांत्रिकी (वेल्डिंग, प्लंबिंग, बांधकाम, सुतारकाम), धातुकाम ,बांबूकाम,लाकडावरील कोरीवकाम , दगडातील कोरीवकाम,आयुर्वेद ,कृषि-गो-ज्ञान, गायन वादन, पॉटरी, शिल्पकला, गृहविज्ञान, संगणक, शिक्षणशास्त्र इ.चे शिक्षणही दिले जाते. याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध क्रिडाप्रकार माहीती व्हावेत यासाठी क्रिडामोहोत्सवाचे आयोजन केले जाते.

एल. टी. आय कंपनी व विज्ञान आश्रमच्या माध्यमातून विद्यार्थांना मुलभुत तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रत्यक्षिताच्या माध्यमतून दिले जाते. त्यातून विद्यार्थ्यांना उर्जा व पर्यावरण, अभियांत्रिकी, कृषी व पशुपालन तसेच गृह व आरोग्य याची माहीती होते व त्यातून विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण मिळते व त्यांचे कौशल्य विकसित होत आहे. मुलांना इलेक्ट्रिक दुरूस्ती लाईट फिटींग, प्लंबीग, वेल्डींग, सुधारीत शेती, चारा वाढ व विविध पदार्थांची माहीती होते व त्याना ते करता येते. करोनावरती मात करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडचे द्रावण तयार करण्यासाठी मशिन विद्यार्थ्यांनी तयार केली आहे तसेच शाळेतील विविध दुरूस्त्या विद्यार्थी निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात. आज या ठिकाणी ४०० च्या वर मुले मुली शिकत असून सर्व विद्यार्थी निवासी आहेत.

Empowered By

Organized By