भाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र

Unit for Sodium Hypochlorite Solution

Innovation

समस्या: कोरोनाच्या काळात बाजारातून आणलेला भाजीपाला, फळे यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक होते.

प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा-पर्यावरण या विभागामध्ये एक काचेचे भांडे तयार करून त्यात ६ कार्बन चे रॉड बसवून अडॅप्टर च्या आउटपुटला कनेक्ट करून हे उपकरण तयार केले. यात १५ ली. पाणी आणि ३०० ग्रॅ.  मीठ यांचे द्रावण टाकून दोन तासांसाठी विद्युत प्रवाह चालू केला असता हिरवट-पिवळसर सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार होते. याचा वापर भाजीपाला निर्जंतुकीकरणासाठी करतात. हे द्रावण जीवाणू, विषाणू, बुरशी यांच्या संपर्कात येऊन सुक्ष्मजंतूंच्या पेशींमधील रेणूंचे ऑक्सिडेशन करून त्यांना मारण्याचे काम करते. गुरुकुलम मधील रोज १५ कि.ग्रॅ भाजीपाला या मशिन ने तयार केलेल्या द्रावणाने निर्जंतुक केला जात आहे.

एकूण खर्च: २४०० रुपये (१५ ली. क्षमतेच्या द्रावणासाठी)

Other Projects

Empowered By

Organized By

1 Comment

  1. Pratik Patil

    Very Nice Project for cleaning vegetables from bacteria and viruses. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *