कडधान्यांना लवकर मोड आणण्याचे यंत्र

Sprouter Machine

Affordable Technology

समस्या: गुरुकुलम आश्रम शाळेमध्ये ३५० निवासी विद्यार्थी आहेत. त्यांना नाष्ट्यासाठी हरभरा, वाटाणा, मूग, मटकी इ. कडधान्यांचा समावेश केला जातो. परंतु या कडधान्यांना मोड येण्यासाठी कमीत कमी ३ दिवस लागतात. कमी वेळेत मोड आणण्यासाठी हे उपकरण बनविले आहे.          

प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी गृह-आरोग्य विभागामध्ये अल्युमिनियम च्या २ चाळण्या, फॉगर, मोटार, बबलर, टायमर, स्टँड इ. साहित्य वापरून मोड आणण्याचे मशिन तयार केले. मोड येण्यासाठी ३०-३५ अंश से. तापमान, ८०-९० % आद्रता आणि पुरेसा ऑक्सिजन अशा प्रकारचे वातावरण आवश्यक असते. दर एका तासाला अर्धा मिनिट पाणी कडधान्यांवर फॉगर च्या सहाय्याने पडते त्यामुळे तिथे आद्रता तयार होते. बबलर मुळे ऑक्सिजन देखील मिळतो त्यामुळेच कडधान्यांना लवकर मोड येतात. सध्या गुरुकुलम मध्ये याचा वापर सुरु आहे १-२ दिवसांत २-३ इंच इतके मोड येतात. सध्या आठवड्यातून ३-4 दिवस कडधान्यांची उसळ १०० मुलांना मुलांना जाते.

एकूण खर्च: ३००० रुपये (६ कि.ग्रॅ. कडधान्यांच्या क्षमतेसाठी)

Other Projects

Empowered By

Organized By

3 Comments

  1. सतिश

    छानच प्रकल्प आहे.

    Reply
  2. Pratik Patil

    Very Nice Project. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.

    Reply
  3. गौतम इंगळे

    खुप छान प्रकल्प केला आहे, यामधुन तुमची नवनिर्मिती,मेहनत दिसुन येते.खुप खुप शुभेच्छा

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *