स्वयंचलीत पध्दतीने पाण्याचा पुनर्वापर करणारी कुंडी
Bucket In BucketAffordable Technology
समस्या: नांदे गावात झपाट्याने शहरीकरण होत असल्याने उंच स्लॅबच्या इमारती होत आहे; त्यामुळे आम्ही टेरेस वर कुंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावतो पण कुंड्यांमधील जास्त झालेले पाणी टेरेस वर साचून तेथील जागेवर शेवाळ, डास, दुर्गंधी इ. प्रकारचा त्रास होतो.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी शेती-पशुपालन विभागात प्लॅस्टिकच्या २ बादल्या, PVC पाईप, लेवल ट्यूब, सुती कापडाच्या पट्ट्या इ. साहित्य वापरून ही कुंडी तयार केली. याचा वापर करताना ३/4 माती आणि १/२ शेणखत बादलीत घेऊन झाडाची लागवड करून बादली एकात एक ठेवावी. यात झाड केशाकर्षण पद्धतीने पाणी गरजेनुसार घेते आणि झाड नेहमी वापसा स्थितीत राहते. झाडाच्या चांगल्या वाढीसाठी २५% हवा, २५% पाणी, ४५% खनिजमिश्रित माती, ५% सेंद्रिय कर्ब यांची आवश्यकता असते. हे सर्व अनुकूल वातावरण झाडाला या कुंडीमध्ये मिळते आणि झाड जोमदार वाढते.
एकूण खर्च: १८० रुपये
Other Projects
हायड्रोपोनिक – माती विना शेती
LED Hydroponic System
सांडपाण्याचा पुर्नवापर
Grey Water Recycling System
अतिनील निर्जंतुकीकरण टॉर्च
Problem Solvingसमस्या: सर्वच वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी आपण सॅनिटायझर वापरू शकत नाही. जसे पुस्तक, लॅपटॉप,...
खूपच छान
Very nice school keep it up
Very good…
Sanika
nice ,keep it up
excellent
नाविन्यपूर्ण विचार
खुप छान