जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा, नांदे

जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा नांदे. ता. मुळशी जि. पुणे या शाळेची स्थापना १९५५ मध्ये झाली असुन शिशुवर्ग ते दहावी पर्यंत वर्ग असणारी ही जिल्हा परिषदेची पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे असुन एल.टी.आय व विज्ञान आश्रम यांच्या सहकार्याने आय. बी.टी हा उपक्रम चालविणारी जिल्हा परिषद पुणे ची एकमेव शाळा. या शाळेमध्ये सुसज्ज इमारत, आय.बी. टी लॅब, प्रयोगशाळा, संगणक लॅब ,प्रशस्त सभागृह असुन सोलर पॅनल, स्मार्ट बोर्ड ,डिजिटल वर्ग सी. सी. टी.व्ही कॅमेरा ,बॅटरी बॅकअप ,अम्प्लिफायर इत्यादी आधुनिक सोयी उपलब्ध आहे. ही शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळची मान्यता मिळालेल्या पुणे जिल्हातील ३ शाळांपैकी १ आहे. येथिल विद्यार्थींनी सांघिक व वैयक्तिक खेळ ,सांस्कृतिक स्पर्धा ,नृत्य नाट्य यांमध्ये जिल्हास्तरावर नैपुण्य मिळवलेले असुन यंदा १० वी च्या पहील्या बॅचचा १०० % निकाल लागला आहे. नवोदय परीक्षेत संपूर्ण मुळशी तालुक्यातून एकमेव निवड झालेली मुलगी ही नांदे शाळेची आहे. शाळेमध्ये अतिशय हुशार व हरहुन्नरी असा शिक्षक स्टाफ आहे.

आय. बी. टी मध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कर होतेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व करीयर निवडीबाबतची माहीती प्रात्यक्षिकातून मिळत आहे. यामध्ये विद्यार्थी विविध समाजउपयोगी प्रकल्प करत आहे तसेच एल. टी आय व विज्ञान आश्रम मार्फत भरविण्यात येत असलेल्या टेक्नोव्हेशन प्रदर्शनामध्ये ही सहभागी होत आहेत यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यांना प्रोत्साहन देखील मिळत आहे.
याव्यतीरिक्त शाळेमध्ये लुपिन फौंडेशन तर्फे संगणक शिक्षक नेमलेला असून ८० विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत, इंडिया स्पॉन्सरशीप ,सिंबायोसिस कॉलेज यांच्यामार्फत अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वर्ग ,किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन वर्ग घेतले जातात, अमेरिकन इंडिया फौंडेशन कडून गणित व इंग्रजी विकसन यासाठी वर्ग घेतले जातात.

Empowered By

Organized By