अतिनील निर्जंतुकीकरण पेटी
UV Disinfection BoxProblem Solving
समस्या: शाळेतील सार्वजनिक वापरावयाच्या वस्तू उदा. चाव्या, स्टेपलर, पंचिंग मशिन, शिक्के, पेन, पुस्तके इ. वापरताना अनेक व्यक्तींचा स्पर्श होत होता त्यामुळे कोरोना विषाणू चा प्रसार होऊ शकतो अशी भीती होती त्यामुळे या वस्तू निर्जंतुक करणे आवश्यक होते.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा-पर्यावरण विभागामध्ये एक प्लायवूड चे बॉक्स तयार करून त्यात UV ट्यूब बसवून अडॅप्टर द्वारे स्वीच ला जोडणी केली. या ट्यूब चा प्रकाश आतमध्ये परावर्तीत होण्यासाठी अल्युमिनियम फॉइल सर्व बाजूला आतमध्ये लावला आणि अशा प्रकारे अतिनील निर्जंतुकीकरण पेटी तयार केली. या पेटी मध्ये वापरलेल्या UV – C प्रकारच्या ट्यूबच्या प्रकाशाच्या सानिध्यात आलेल्या वस्तूवरील जीवाणू, विषाणू, जंतू यांचा नाश होतो आणि वस्तू ३ मिनिटांत पूर्णपणे निर्जंतुक होते. गेल्या तीन महिन्यांपासून शाळेतील सार्वजनिक वापरावयाच्या वस्तू या पेटीत निर्जंतुक केल्या जात आहे त्यामुळे वस्तू हाताळताना कोरोना विषयीची भीती कमी झाली.
एकूण खर्च: १५०० रुपये
Other Projects
इन्स्टंट पुरण
Instant Pooran
मोबईल वर घरातील दिवे चालू-बंद करणे.
Home Automation System
रोगप्रतिकार शक्तीसाठी व्हिटॅमिन ‘सी’ बास्केट
Learning While Doingसमस्या: ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती चांगली ती व्यक्ती आजाराला लवकर बळी पडत नाही....
Really good and important gadget☺
सद्य परिस्थितीला अनुरूप असे अतिशय सुंदर प्रकल्प सादर केले आहेत.
Very nice
It’s very nice project 👍👍
Very Nice Project in the difficult times of Covid 19 Pandemic. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.