इंदिराजी माध्यमिक विद्यालय, मोई

आमच्या इंदिराजी माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९९३ साली झाली व सन जून २००० साली विद्यालयास शासनाची मान्यता प्राप्त झाली. डिसेंबर २००५ पासून विद्यालय अनुदान प्राप्त झाले. गेली तीन वर्ष विद्यालयाचा इ १० वीचा निकाल १००% लागत आहे. त्यात विज्ञान आश्रम पाबळ व एल.टी.आय. कंपनी च्या सहकार्याने IBT ( पूर्व व्यावसायिक अभ्यास क्रम) सुरु आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कृतितून शिकता येते व त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे आवडीने विद्यार्थी प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. विद्यार्थांचे शाळेत उपस्थिती चे प्रमाण वाढले आहे. पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. विद्यालयात ८ वी, ९ वी, १० वी असे तीन वर्ग भरतात त्यामध्ये ११३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरकारी चित्रकला परिक्षा, NMMS, माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात . शासकिय शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवलेले आहे.

शाळेमध्ये सध्या आय. बी. टी. अंतर्गत चार विभाग सुरू असून विद्यार्थ्यांनी या विषयाचे शिक्षण घेत असताना गावातील समाजाला अनेकविध सेवा दिल्या आहेत त्यामधील उल्लेखनिय सेवा म्हणजे गावातील मंदीरातील लाईट फिटीमग व हॅलोजन बल्ब लावून दिला आहे त्यामुळे रात्रीच्यावेळी त्याठिकाणी प्रकाश मिळून लोकांना जा-ये करता येते, ग्रामपंचायतीमध्ये गावातील रस्त्यावरील सहा विजेच्या खांबावरती एल.डी.आर बसवून दिले आहे त्यामुळे लाईट लावणे बंद करणे इत्यादीसाठी मनुष्यबळ कमी लागत आहे. अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यवसायिक दृष्टीकोन वाढण्यास मदत होत आहे. यासाठी अनेक सामाजीक संस्था विद्यालयास सहकार्य करत असतात. त्यामध्ये एल.टी.आय. कंपनी विज्ञान आश्रम पाबळ, दुर्गादेवी च रिटेबल ट्रष्ट, यश फाऊडेशन, चाकण, रोटरी क्लब, लायन्स क्लब व शाळेचे माजी विद्यार्थीसुध्दा विद्यालयाला चांगले सहकार्य करत असतात.

Empowered By

Organized By