न्यू इंग्लिश स्कूल, धामारी
Our Projects
शेतकऱ्यांसाठी सुलभ कांदा काठणी यंत्र
Onion stem & root cutter
स्वयंचलित विद्युत घंटा
Automatic electric bell
खंडेराय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू इंग्लिश स्कूल धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेची स्थापना जून 1983 मध्ये झाली. शाळेत आय बी टी प्रोग्रमॅ ची सुरुवात सन 1988 मध्ये झाली त्या अंतर्गतशाळेमध्ये आय. बी. टी. च्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत विविध उपक्रम घेतले तसेच शाळेतील ऊर्जा पर्यावरण विभागांतर्गत वर्गातील विद्यतु पंखे बसविले, नविन वर्ग खोल्यांचे लाईट फिटींग केले तसेच शाळेतील स्विच दुरूस्ती करणे, स्विचबोर्ड तयार करणे फिटींग करणे इत्यादी कामे केली आहेत. त्याबरोबर अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी सायकल स्टंट तयार केले आहे, शाळेच्या व्हरांड्यातील ग्रील बसविण्याचे काम केले आहे तसेच शाळेतील बेंच दुरूस्ती करणे, वर्गांना रंग देणे, दरवाजे वेल्डींग करणे व बसविणे इत्यादी कामे आय.बी.टी.अंतर्गत करण्यात आलेली आहेत.
शाळेतील मिटींग व इतर कार्यक्रमाच्या वेळी खाऊ तयार करणे, जेवण बणविणे व त्याची विक्रकी करण्याचे काम गृह आरोग्य विभागामार्फत विद्यार्थी नियमित करत असतात. त्यातून त्यांना पदार्थ तयार करण्याच्या विविध पध्दती व विक्रीकला अवगत होते. विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा आरोग्य तपासणी चा कार्यक्रम, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी इयत्ता उपक्रम विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. शेती विभागांतर्गत विद्यालयातील छोट्या रोपांना ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था करणे, रोपवाटीकेमध्ये विविध रोपांची लागवड करे, कलमे तयटार करणे, शास्त्रीय पध्दतीने शेती करणे असे देखिल उपक्रम विद्यार्थांनी घेतले आहेत. एल. टी. आय व विज्ञान आश्रम यांच्यामार्फत शाळेमध्ये आय. बी. टी विभाग सुरू असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना करियर निवडीमध्ये, इंजिनिअरिंगचे व आय.टी.आय. चे शिक्षण घेण्यासाठी त्याचा फायदा होत आहे.