श्री. संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल, मुखई
Our Projects
डिस्टील्ड वॉटर उपकरण
Distilled Water Device
स्वयंचलीत विजेचा दिवा
Automatic Light ON/OFF
सन १९६७ पूर्वी मुखई व परिसरातील गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती.प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना १० किमी दूर शिक्रापूर किंवा पाबळ येथे जावे लागे. मुलींचे शिक्षण थांबायचे हि समस्या लक्षात घेउन स्वता पदरमोड करून श्री संभाजीराव पलांडे पाटील यांनी श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ, मुखई ,तालुका -शिरूर, जिल्हा – पुणे संचालित श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल, मुखई ,तालुका -शिरूर जिल्हा – पुणे या विद्यालयाची स्थापना १२ जुलै १९६७ रोजी श्री .संभाजीराव पलांडे व श्री .रामराव पलांडे यांनी केली .शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी चे वर्ग आहेत. सर्व वर्गांच्या प्रत्येकी १ तुकडी आहे .१९६७ साली छोट्या जागेत स्थापन केलेल्या विद्यालयाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.सध्या सौ.जयश्रीताई अशोकराव पलांडे या संस्थेच्या अध्यक्ष आहेत.
विद्यालयात शालेय शिक्षनाबरोबर विज्ञान आश्रम पाबळ यांच्या सहकार्याने व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम आय.बी.टी .हा अभ्यासक्रम इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यासाठी राबवला जातो.विद्यालयातील माजी विद्यार्थी उद्योजक तसेच शासकीय अधिकारी आहेत.