श्री. भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ
Our Projects
वातावरणातील तापमान-आर्द्रता सांगणारा फलक
Temperature & Humidity Display
स्वयंचलित कचरापेटी
Smart Dustbin
श्री भैरवनाथ विद्या मंदीर पाबळ या प्रशालेची स्थापना 15 जून 1956 मध्ये झाली. प्रशालेचे कामकाज शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेच्या मार्फत चालविले जाते. या वर्षी 2021 -22 मध्ये पाचवी ते बारावी असे एकूण 1588 विद्यार्थी प्रशालेत शिकत आहे. सन 1986 पासून 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आय.बी.टी या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे .त्यामध्ये अभियांत्रिकी, शेती पशुपालन, ऊर्जा पर्यावरण आणि गृह आरोग्य यासारखे विषय शिकविले जातात. खेळासाठी भव्य असे पटांगण आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सहल आयोजित करणे, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा भरविणे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे, योगासने-प्राणायाम शिबीरे आयोजित करणे यांसारखे उपक्रम राबवले जातात. प्रशालेमध्ये सुसज्ज अशा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भूगोल आणि संगणक लॅब आहेत. संस्थेच्या मार्फत आय.टी.आय. सीनियर कॉलेज हे सुद्धा चालवले जाते. श्री भैरवनाथ शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था या नावाने शिक्षकांची पतसंस्था 1974 ला स्थापन केलेली आहे.