हनुमान माध्यमिक विद्यालय, निमगाव भोगी

हनुमान माध्यमिक विद्यालय निमगाव भोगी या शाळेची स्थापना १जून १९९२ रोजी झाली असून ग्राम विकास संस्था निमगाव भोगी या संस्थेमार्फत हे विद्यालय चालवले जाते.

जून १९९२ पासून सुरु झाले ते सुरुवातीला ८ विचा वर्ग जून १९९२ ला सुरु झाला तो विना अनुदानीत तत्वावर झाला. व नंतर ९ वी १० वी चे वर्ग आजूबाजूच्या सोनेसांगवी व ढोकसांगवी या गावात विद्यालय नव्हते. गावात १ ली ते ७ वी चे वर्ग प्राथमिक शाळेत होते. त्यानंतर इयत्ता ८ वी ते १० वीचे वर्ग ५ किमी अंतरावर होते. हे त्यावेळी जि.प.सदस्या सौ.उषाताई लक्ष्मणराव बढे यांच्या लक्ष्यात आले. आणि त्यांनी गावकर्यांच्या मदतीने गावात ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायतच्या खोल्यात विद्यालय सुरु केले. पुढे १९९८ ला अंशात अनुदान प्राप्त झाले. व सन २००० ला १००% अनुदान मिळाले.

सुरुवातीला विध्यार्थी संख्या कमी होती. नंतर गावातील मुले मुली गावातील शाळेत येऊ लागली. सोनेसांगवी व ढोकसांगवीचे विध्यार्थी शिक्षणाचा दर्जा पाहून या ठिकाणी येऊ लागली.

२०१३ पासुन विद्यालयाला संस्थेचे अध्यक्ष श्री.बढे लक्ष्मणराव यांनी स्वताची जागा शाळेला बक्षीसपत्र करून दिली आणि नंतर शाळेला इमारत बांधण्यात आली “अश्तानो काम इंडिया “या संस्थेने आर्थिकसहाय्य केले व ग्रामस्थांच्या लोक वर्गणीतून व MIDC तील “कमिन्स कंपनी “ ,”फियाट कंपनीच्या “ सी.एस.आर.फंडातून इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. आज शाळेला सुसज्ज अशी इमारतआहे.

विद्यालय सकाळी ९.३० वा.सुरु होते. सकाळी इयत्ता १० वीच्या वर्गाचे जादा तास घेतले जातात. एन. एम. एम. एस. व स्कॉलरशिपचे तास होतात. विध्यार्थ्यांना योगा शिकवले जाते. दर शनिवारी विध्यार्थ्यांचे कराटे क्लास घेतले जातात. इ.८ वी ते इ.१० वी च्या वर्गाला काम्पुटर शिक्षण दिले जाते. ई-लर्निंग द्वारे शिक्षण दिले जाते. शाळेला अद्यावत काम्पुटर कक्ष आहे.

दरवर्षी क्रीडा स्पर्धा, ग्यादरिंग तशेच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यामुळे मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते.

आमचे विद्यालयात “विज्ञान आश्रम पाबळच्या” सहकार्याने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून आय.बी.टी. हा विभाग सुरु करण्यात आला आहे. या विषयामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकाशित होत आहे. त्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी, उर्जापार्यावरण, शेती-पशुपालन तशेच ग्रह-आरोग्य या चार विभागामार्फत विध्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामध्ये मुलांना स्वत काम करण्याचा अनुभव येतो. उदा. वेल्डिंग करणे, विविध खाद्यपदार्थ बनवणे,शेतात मल्चिंग द्व्यारे पिकं घेणे, ठिबक सिंचन ,तुषार सिंचन,गांडूळखत निर्मिती तशेच रोपवाटिका तयार करणे,सुतारकाम करणे, प्लंबिंग करणे, बांधकाम करणे तशेच इलेक्ट्रोनिक ची वेगवेगळी कामे करण्यास शिकवली जातात.

आय.बी.टी.विभागामुळे विद्यालयाचा पट वाढण्यास मदत झाली आहे. हा विभाग चालवण्यासाठी आम्हाला पुणेकर सर, भोर सर व जाधव सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.

Empowered By

Organized By