स्वामी विवेकानंद विद्यालय, असदे

स्वामी विवेकानंद विद्यालय, असदे।, ता. मुळशी जि. पुणे या शाळेची स्थापना सन १९९९ मध्ये झाली असुन राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या अंतर्गत चालविण्यात येते यामध्ये शिक्षण, संस्कार, आारोग्य, कृषी व स्वावलंबन आधारित ग्रामविकास यावरती भर दिला जातो. उपरोक्त शाळेत मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख म्हणजेच आय. बी.टी हा विषय सन २००६ पासुन शिकवला जातो. त्या अंतर्गत ती विषयक विविध तांत्रिक कामे केली असुन या क्षेत्रामध्ये भात पिक घेतले जात असल्यामुळे विद्यार्थ्याना चारसुत्री पद्धतीने भात लावणे, फवारणी करने, अंतर- पीक घेणे इ. तांत्रिक बाबींचे प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले होते त्याचा त्यांना फायदा झाला आहे. तसेच आय बी टी च्या माध्यमातून रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी, मेडल्स(ट्रॉफिज) बनवून विक्री करणे, शेती अवजारे दुरुस्त करने, नवीन बनवने, प्लबिंग व फिटिंगची कामे करणे, विविध इलेक्ट्रीकल उपकरणांची दुरुस्ती करणे, गावात शोषखड्डे घेणे त्याचे   महत्व पटवून देणे, खाद्यपदार्थ बनवून विक्री करणे इत्यादी कामे विद्यार्थ्यांनी केली आहेत. त्याचबरोबर कोरोना काळात सॅनिटायजर स्टँड व मास्क बनवून विक्री  केली आहे.

या सर्वामुळे मुलांना आपल्या पुढिल करियर निवडीमध्ये उपयोग होत आहे. गेल्या वर्षी प्रथमच १२ मुलांनी आय. टी.आय ला  प्रवेश घेतला. शाळेत शिकूण पुढे गेलेल्या ५७  मुलांनी पुण्यासारख्या ठिकाणी प्लांबिंग व इलेक्ट्रिकलचे स्वतः चे व्यवसाय सुरु केले आहेत. हे सर्व आय.बी.टी मुळे शक्य झाले आहे.

Supported By