सुमती बालवन, गुजर निंबाळकर वाडी,कात्रज

राधाबाई हर्डीकर प्राणिजात मंगल संस्थेचे सुमती बालवन, गुजर निंबाळकर वाडी,कात्रज,पुणे 46 या शाळेची स्थापना सन 2004 साली झाली. शाळेचा उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील मुले मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.त्यांचा सर्वांगीण विकास व सुयोग्य नागरिक घडवण्याचा प्रयत्न करणे. ही शाळा विना अनुदान तत्त्वावरील असुन सध्या बालवाडी ते इयत्ता 10 वी पर्यन्त वर्ग आहे. शाळेत आर्थिक दुरबल गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकतात. शाळेचा उद्देश पुर्ण करताना, या विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व शैक्षणिक जबाबदारी शाळेवर येते, त्या दृष्टीने शाळेत विविध प्रकल्प राबवले जातात व विद्यार्थी त्यात सरस कामगिरी करतात जसे की, राज्य स्तरावर वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेत पाण्याचा योग्य वापर करणे यासाठी ड्रीप इरिगेशन व मॉईश्चर सेन्सर याचा प्रकल्प विद्यार्थ्यांनी शाळेत केला व त्याचे सादरीकरण पुणे विद्यापीठ मध्ये केले व या स्पर्धेत विद्यार्थांनी राज्य स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला.

तीन वर्षापासून एल टी आय व विज्ञान आश्रम यांच्या सहयोगाने आय बी टी उपक्रम शाळेत सुरू आहे, त्याअंतर्गत विद्यार्थीनी विविध म्हत्वाचे उपक्रम शाळेत केले आहेत. त्यामध्ये टाकाऊ प्लास्टिक बॉटल्स पासून पर्यावरण पूरक कट्टा तयार केला.सोलर कॅप, अझोला लागवड, बायोगॅस प्रकल्प, सेंद्रिय खत व सोसायटी कंपोस्टर तयार करणे, ड्रीप इर्रीगेशन मॉईश्चर सेन्सर, अनेमोमेनटर तयार केले. हे प्रकल्प तयार करताना विद्यार्थी मापन पद्धती,वेल्डिंग,फॅब्रिकेशन,कॉस्टिंग, मार्केटिंग स्किल शिकवले जाते, गणित विज्ञानातील तत्वे प्रत्यक्ष वापरल्याने तो विषय सोपा झाला तसेच योग्य वयात हे ज्ञान मिळाल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. तसेच त्यांच्या करिअर निवडीमध्ये त्यांना आय बी टी चा फायदा होत आहे, अभ्यासातील विषयात गती आली असुन वस्तू हाताळायची कौशल्य प्राप्त झाल्याने विद्यार्थी लवकर व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावू शकतात.

त्याचप्रमाणे खेळामध्ये देखील विद्यार्थी अग्रेसर आहेत तय्मध्ये वॉल क्लायंबिंग मध्ये विद्याईथी राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी गेले आहेत.तसेच कमांडो ट्रेनिंग,कराटे, योगा, ध्यान,मूल्यधारीत याचेही शिक्षण शाळेत दिले जाते. इयत्ता 10 वी च्या प्रत्येक वर्षी 100% निकाल असतो तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी हे distinction मध्ये असतात.त्यामुळे शिस्त प्रिय ,अभ्यास व कौशल्य विकासाधारित शिक्षण देणारी शाळा म्हणून परिसरात या शाळेती ओळख आहे.

Empowered By

Organized By