सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज केंदूर या शाळेची स्थापना १ जुन १९६३  मध्ये झाली असून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थाच्या अंतर्गत शाळेचे कामकाज केले जाते. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार या ब्रिद वाक्याने प्रेरीत ही शाळा आहे.या संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे आहेत. या शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत चे वर्ग सुरु आहेत .या शाळेचे प्राचार्य श्री. गावित आर. डी. आहेत.  या शाळेतून आत्तापर्यंत दहावीच्या ५५  तुकड्या यशस्वी बाहेर पडलेल्या आहेत. मराठी व सेमी माध्यमाचा आग्रह, , गरजू विद्यार्थ्यांना माहेर वसतीगृहाची सोय, भव्य क्रीडांगण, प्रयोगशाळा, संगीत वर्ग, सी.सी.टी.व्ही, संगणक खोली , मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, इत्यादी सोई सुविधा उपलब्ध आहेत. मनुष्य घडणीचे शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमांची योजना; जसे सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम, मौनाभ्यास, वेदाध्ययन, दररोज एक जादा तास घेतले जातात. कुठेही शिकवणी न लावता स्वावलंबी स्व- अध्ययन कौशल्य येथे शिकविले जाते. सात  दिवसीय स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह , यामध्ये ,आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे सलग तीन दिवस  आयोजन, गड सहली, वर्षा सहल, सायकल सहल, क्रीडा प्रात्यक्षिके, प्रकल्प, संस्था भेटी, विक्री उपक्रम, व्यक्तिपरिचय,टॅलेंट सर्च परीक्षा , चित्रकला , रांगोळी , ग्रंथ  प्रदर्शन गायन-वादन इत्यादी महत्त्वाचे वार्षिक उपक्रम राबविले जातात.तसेच एन.टी.एस ,एन.एम.एम.एस. शिष्यव्रृत्ती , नवोदय , इंटर्मिजीएट , इलिमेंटरी , प्रज्ञाशोध परीक्षा व इतर बाह्य परीक्षा घेतल्या जातात .

विज्ञान आश्रमा अंतर्गत आय.बी.टी. चे चार विभाग १. शेती व पशुपालन ,२.  उर्जा व पर्यावरण ,३  ग्रुह आणि आरोग्य ,४  अभियांत्रिकी हे विभाग सुरु आहेत.

लेझीम पथक,झांज पथक, कवायत व मैदानी खेळ ही पथके ह्या वैशिष्ट्यपूर्ण गट गावातील विविध कार्यक्रमात प्रसंगानुरुप सहभागी होतात .

Empowered By

Organized By