श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय, चिखली

श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय चिखली या शाळेची स्थापना १ जुन २००५ मध्ये झाली असून मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी, पुणे या संस्थाच्या अंतर्गत शाळेचे कामकाज केले जाते. पंचकोश शिक्षण पद्धतीचा अंगीकार केलेली, घड्याळी अकरा तास चालणारी, रविवार वगळता कुठलीही लाल सुट्टी न घेणारी ही शाळा आहे. याशाळेतून आत्तापर्यंत दहावीच्या 10 तुकड्या यशस्वी बाहेर पडलेल्या आहेत. मराठी माध्यमाचा आग्रह, एका वर्गात केवळ तीस विद्यार्थी, गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क वसतीगृहाची सोय, पोहण्याचा तलाव, भव्य क्रीडांगण, प्रयोगशाळा, संगीत वर्ग, सी.सी.टी.व्ही, मुलांना खेळण्यासाठी बाग, इत्यादी सोई सुविधा उपलब्ध आहेत. मनुष्य घडणीचे शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमांची योजना; जसे सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम, संस्कृत पाठांतर ,मौनाभ्यास, वेदाध्ययन, दररोज एक तास मैदानी खेळ घेतले जातात. कुठेही शिकवणी न लावता स्वावलंबी स्व- अध्ययन कौशल्य येथे शिकविले जाते. दहा दिवसीय मातृभूमी परिचय शिबिर राज्यात व राज्याबाहेर, उन्हाळी शिबिर, उपासनेचे कार्यक्रम,आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे सलग दहा वर्षे आयोजन, गड सहली, वर्षा सहल, सायकल सहल, क्रीडा प्रात्यक्षिके, प्रकल्प, संस्था भेटी, विक्री उपक्रम, व्यक्तिपरिचय,गायन-वादन इत्यादी महत्त्वाचे वार्षिक उपक्रम राबविले जातात.
पोवाडा संच, टाळपथक, लेझीम पथक,बर्चीपथक,भजन व अभंग गट आणि दैनंदिन कामे करणारी मुलांमुलींचे आठ पथके ह्या वैशिष्ट्यपूर्ण गट गावातील विविध कार्यक्रमात प्रसंगानुरुप सहभागी होतात .
निसर्ग रम्य ,सर्व सोयी व सुविधांनी युक्त सुमारे चार एकराच्या परिसरामध्ये वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या सहवासातून संस्कारक्षम शिक्षण देण्याची योजना केलेली आहे.

विद्यार्थ्यांचे व्यवसाय कौशल्य वाढुन त्यांना त्यांचे करीयर निवडता यावे यासाठी एल. टी. आय व विज्ञान आश्रम पाबळ यांच्या वतीवे शाळेमध्ये आय.बी.टी.हा विभाग सुरू केलेला आहे .या अंतर्गत
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिक्षण घेत असताना शाळेतील खेळणी दुरुस्ती, वर्गातील वैशिष्ट्यपूर्ण रंगकाम,यु.व्ही.बॉक्स, रोपवाटिका, आयुर्वेदिकबाग, बागकाम, मत्स्य शेती, कंपोस्ट व गांडूळ खत प्रकल्प, दिवाळी भेटसंच, इम्युनिटी बास्केट, आलेपाक,चहा मसाला, सॅनिटायझर, मायक्रोग्रीन्स, कचरा कुट्टी यंत्र, अॅटोमॅटिक सॅनिटायझर,स्मार्ट स्टिक इ. उपक्रम विद्यार्थ्यांनी निदेशकांच्या देखरेखी खाली केले आहेत यामुळे विद्यार्थ्यांवर स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठेचे तसेच नवनिर्मिती चे संस्कार झाले तसेच विविध कौशल्यांची पायाभरणी झाली व त्यांच्यातील संशोधन वृत्ती वाढीस लागली आहे.

Empowered By

Organized By