न्यू इंग्लिश स्कूल, मारूंजी

जय शिवराय प्रतिष्ठान संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, मारूंजी, ता.मुळशी, जि.पुणे या शाळेची स्थापना जून 1996 मध्ये झाली असून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. तसेच सुसज्ज इमारत, आय.बी.टी लॅब ,प्रयोगशाळा, संगणक कक्ष, बॅटरी बॅकअप, अॅम्प्लिफायर इत्यादी अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. एल.टी.आय. व विज्ञान आश्रमच्या सहकार्याने आय.बी.टी. उपक्रम विद्यालयात चालू आहे. क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवले आहे. यंदाच्या दहावीच्या बॅचचा निकाल 98.50% आहे. दरवर्षी शाळेचा निकाल 95% पेक्षा जास्त असतो. विद्यालयाचा इ. 10 वी च्या परीक्षेचा निकाल नेहमीच जास्त लागत असुन तालुक्यातील मुलांमध्ये प्रथम येणार्‍या तीन क्रमांकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे व त्यांना उंडार्प संस्थेची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. 

एल.टी.आय. व विज्ञान आश्रमच्या माध्यमातून विद्यार्थांना कौशल्य विकास व उद्योजकता वाढ होण्यासाठी आय.बी.टी विभाग सुरू करण्यात आला आहे.  विद्यालयातील 85 गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी बीईंग फाऊंडेशन, आयडिया फाऊंडेशन व उर्मी संस्थेच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्ती प्राप्त होत आहे. मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी आय. टी कंपनीना भेट व कौशल्य विकासाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे व नाविन्यपुर्ण उपक्रम सादर करण्यासाठी दरवर्षी आयसर संस्थेस भेट देणे, सायन्स पार्क ला भेट देणे तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात भाग घेणे व शालांतंर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करणे, तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडास्पर्धेत विद्यार्थीना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण, तसेच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गावातील लोकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण करण्यासाठी ग्रामस्वच्छता करणे, वृक्षांची लागवड करणे, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून दृष्टीदोष असणाऱ्या मुलांना मोफत चष्मे मिळवून दिले जात आहेत. मुलीच्या शिक्षणाला प्रोत्याहन देण्यासाठी ४८ मुलींना  सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे 40 विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या विद्यालयात आज 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाच्या विकासासाठी ग्रामस्थ व शिक्षक वर्ग नेहमी प्रयत्न शील आहे. संस्थापदाधिकारी यांचेही अनमोल सहकार्य लाभले आहे.

Empowered By

Organized By