नरसिंह विद्यालय, ताथवडे

नरसिंह विद्यालय ताथवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या विद्यालयाची स्थापना जून 1990मध्ये करण्यात आली. ताथवडे गावाचे ग्रामदैवत श्री नरसिंह यांच्या नावावरून विद्यालयाचे नाव नरसिंह विद्यालय असे ठेवण्यात आले. हे विद्यालय नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या अंतर्गत चालविण्यात येते. येथे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग असून एकूण 226 विद्यार्थी शिकत आहेत.शैक्षणिक वर्ष सन 2019- 20 पासून विज्ञान आश्रम पाबळ, व एल टी आय कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आय बी टी (इन्फॉर्मेशन ऑफ बेसिक टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये शेती व पशुपालन, गृह आणि आरोग्य, ऊर्जा व पर्यावरण,तसेच अभियांत्रिकी हे चार विभाग आहेत.या विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक व उपक्रम घेतले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होते.

यात प्रामुख्याने अभियांत्रिकी विभागामार्फत मिनी कार वॉश कॉम्प्रेसर तसेच सध्या उद्भवलेल्या कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर टू इन वन हॅन्ड वॉश बेसिन तयार करणे, प्लंबीगचे साहित्य वापरून कपाट, ग्लास स्टॅंन्ड, कपडे सुकवण्यासाठी स्टॅन्ड इत्यादी वस्तु विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत तसेच गृह व आरोग्य विभागातर्फे विविध प्रकारचे अन्नपदार्थ जसे शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू,मिरची आंबा लिंबांचे लोणचे, केक, टाकीव वस्तुंपासून शोभेच्या वस्तु, विद्यार्थ्यांसाठी मास्क इ. वस्तु तयार केल्या आहेत. ऊर्जा व पर्यावरण विभागामार्फत अन्नपदार्थ निर्जंतुकीकरण यंत्र, तसेच इलेक्ट्रिक बोर्ड भरणे फॅन, इस्त्री, ट्यूबलाईटची दुरुस्ती व शाळेचे अर्थिंग केले आहे व शेती व पशुपालन विभागामार्फत पिकाची लागवड करणे, उत्पादन घेणे, रोग किड नाशके तयार करणे व वापरणे, नॕकसॕक पंप वापर व दुरुस्ती, तुषार व ठिबक सिंचन या आधुनिक जलसिंचनाच्या प्रकारांची माहिती विद्यार्थ्यांना झाली आहे. हे प्रकल्प करत असताना ड्रिल मशीन, वेल्डिंग, कटिंग प्लंबिंग इत्यादी प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त केले आहे यामुळे भविष्यात त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फायदा होईल.

Empowered By

Organized By