आदर्श विद्यालय, आंबोली
Our Projects
शेतकऱ्यांसाठी धान्य भरणी उपकरण
Grain Filler for farmers
ट्रान्सफॉर्मर सुरक्षा किट
Transformer Security Kit
श्री.बापदेव शिक्षण प्रसारक मंडळ आंबोली अंतर्गत , आदर्श विद्यालय आंबोली.तालुका खेड, जिल्हा पुणे या विद्यालयाची स्थापना सन 1993 मध्ये करण्यात आली, हे विद्यालय अदिवासी डोंगराळ भागात असुन आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विद्यालयात इयत्ता 8वी ते 10वी चे वर्ग असुन प्रत्येक वर्गात जवळ जवळ 70 पटसंख्या आहे. सलग 14 वर्षे 100 टक्के लागणारा 10 वी चा बोर्ड परीक्षेचा, तसेच एल. टी.आय. व विज्ञान आश्रम पाबळ यांच्या सहकार्याने सुरू असलेला आय. बी. टी. अभ्यासक्रम यामुळे २०० इतकी विद्यार्थींसंख्या आहे. विद्यालयात सुसज्ज अशी इमारत, संगणक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, मिनी सायन्स सेंटर, डिजिटल वर्ग, सोलर सुविधा, आरो प्लांट, इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.या सर्व गोष्टी बरोबरच 2017 पासून सुसज्ज अशी आय . बी. टी.लॅब सुरू केली आहे. विद्यालयाने सन 2005 पासून विज्ञान प्रदर्शनात ठसा उमटवला आहे.आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या वतीने घेतलेल्या विज्ञान प्रदर्शनात तब्बल 15 वेळा तालुकास्तरावर ;5वेळा जिल्हा स्तरावर प्राविण्य मिळवले असून 5 वेळा राज्यस्तरीय प्रदर्शनात जाण्याचा मान मिळाला आहे. Inspire Award स्पर्धेतही एकाच वर्षी दोन प्रकल्प राज्य स्तरावर निवडले गेले आहेत. सन 2018-19 मध्ये विविध स्पर्धात 5 प्रकल्प राज्य स्तरावर व एक प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर घेवून जाणारी जिल्ह्यातील एकमेव अशी शाळा आहे. एल. टी.आय. व विज्ञान आश्रम पाबळ यांनी भरविलेल्या टेक्नोव्होशन २०२० मध्ये प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला होता. NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत आत्तापर्यंत 15 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. वरील सर्व विभागात यश मिळणे हे शक्य झाले केवळ विद्यालयातील हुशार व मनापासून काम करणाऱ्या शिक्षक वृंदामुळे व सर्वांना प्रेरणा देणाऱ्या मुख्याध्यापक यांच्यामुळे व सर्वांना साथ देणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी यांच्या मुळेच.
आय.बी . टी.अभ्यासक्रम विद्यालयात 2017 पासून सुरु केला आहे या विभागामार्फत प्रकल्प तयार करणे, पोषण आहार योजनेसाठी पूरक आहार पुरवणे, भागातील लोकांचे रक्तगट तपासणी, शिक्षक ट्रेनिंग साठी नाष्टा जेवण पुरवणे, प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी तोफ बनवणे, विजेपासून संरक्षणासाठी विद्युत गळती सुचक बनवणे, पाणी बचत यंत्र बनवणे इत्यादी.लोकोपयोगी सेवेच्या माध्यमातून गावातील विविध समस्या सोडविण्याचे केले जाते.यामुळे विद्यार्थी व्यवसायाकडे वळत आहेत व आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. मुलांचा टेक्निकल कोर्सकडे जाण्याचा कल वाढला आहे. या सर्व प्रगतीत संस्थेचे सर्व पदाधिकारी :मुख्याध्यापक; शिक्षक;सर्व कर्मचारी वर्ग ;ग्रामस्थ ;पालक यांनी एकजुटीने प्रयत्न केलेले आहेत.