हायड्रोपोनिक्स पद्धतीने पिकांची लागवड करणे

Hydroponics Technique For Crop Cultivation

Experimentation

समस्या: मारुंजी गावामध्ये जागेची कमतरता असल्यामुळे उपलब्ध जागेमध्ये व कमी खर्चामध्ये भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान सर्वांना समजावे व त्याचा वापर करून भाजीपाला लागवड करता यावी यासाठी या प्रकल्पाची निवड करण्यात आली.

प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी शेती पशुपालन विभागामध्ये प्लॅस्टिक च्या बाटल्या प्रथम ग्लास बसेल या आकारामध्ये कापून एकमेकांना एम-सील च्या सहाय्याने जोडून घेतल्या. प्लॅस्टिक च्या ग्लास मध्ये कोकोपीट भरून त्यात गव्हांकुर ची लागवड केली. ७ दिवसांनतर गव्हांकुर कापण्यासाठी तयार झाला. ही मातीविना शेती असून पूर्णपणे पाण्यावर पिकांची वाढ केली जाते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी सर्व ठिकाणी फिरते आणि पाण्यावाटे पोषक द्रव्ये सोडल्याने मुळ्यांची वाढ चांगली होऊन पीक चांगले येते. अशा प्रकारे हायड्रोपोनिक शेती ही गच्चीवर, मोकळ्या जागेमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये करून भाजीपाला पिकविता येतो.      

एकूण खर्च: १०० रुपये

Other Projects

Empowered By

Organized By

8 Comments

  1. शिव

    घरच्या घरी बनऊ शकता

    Reply
  2. Abhay shivale

    This project very important. And this project very nice.

    Reply
  3. Amol vishnu jalkute

    Mst project aheat

    Reply
    • Akshay Dherange

      Ek number project ahe

      Reply
  4. Arun Maharanwar

    I want more details of this project

    Reply
  5. Smita sunil khule

    Khup chan ahi arogay Saturday❤❤👌

    Reply
  6. Amol khatke

    Nice

    Reply
  7. Vikas Suresh Lohot

    What is mixture of cocopit

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *